Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बृहन्मुंबई फायर ब्रिगेडची विक्रमी कामगिरी

बृहन्मुंबई फायर ब्रिगेडची विक्रमी कामगिरी

वेबदुनिया

मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (15:49 IST)
NDND
मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या दहाशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर, एनएसजीचे कमांडो, नौदल, महाराष्ट्र पोलीस यांनी मोलाची कामगिरी केलीच, त्याबरोबर मुंबई फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांनी लष्कराच्या मदतीने विक्रमी कामगिरी केली असल्याचे बृहन्मुंबई फायर ब्रिगेटचे फायर फायटर मनोहर पाटील यांनी वेबदुनियाशी बोलताना सांगितले.

मुंबईत दहशतवादी शिरले असल्याचे माहिती कळताच बृहन्मुंबई फायर ब्रिगेडचे प्रमुख ए.व्ही.सांवत सहकार्‍यांची बैठक बोलावून तयारीला लागले. बुधवारी रात्रीपासूनच हॉटेल ताजच्या बाहेर पाण्याने भरलेले जब्बो टॅंकर उभे करण्यात आले. फायर फायटरांनी अक्षरश: जीवाची बाजी लावून रात्रदिवस घटना स्थळी चोख ड्युटी केली.

सुरवातीला उपप्रमुख श्री. कुरकुट्टीकर, यु.के. तटकरे यांच्या मार्गदर्शनाने फायर फायटर हॉटेल ताजवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी दहशतवाद्यांकडून फेकण्यात येणारे ग्रेनेड व एके 47 मधून बेछूट चालणार्‍या गोळीबाराने हॉटेल ताजच्या वरच्या मजल्याला आग लागली. ताजची बिल्डिंग उंच असल्याने फायर ब्रिगेडच्या दोन नंबर वर्दीचे ऑपरेशन सुरू करण्यात आले. एपीएल आणि टीपीएल शिडीने फायर फायटरांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता लष्कराच्या मार्गदर्शन व सहकार्याने आग आटोक्यात आणण्याबरोबर आगीचा मुळ शोधून त्यावर पाण्याचा मारा करून ते शांत करत होते. आगीचे लोट अंगावर घेऊन फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ताजच्या चहूबाजुंनी फायर फायटरांनी वेढा घातला होता. आगीवर लक्ष ठेवून होते.
webdunia
NDND

हॉटेल ताजच्या खिडक्या, फर्निचर लाकडी असल्याने आग चांगलीच पसरली होती. शनिवारी ती खालच्या मजल्यापर्यंत पोहचली. आगीचे लोट व काळ्या धुरामुळे कमांडोंच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत होता. तेव्हा आग आटोक्यात आणणे हे फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यासमोर एक मोठे आव्हानच होते. त्यामुळे 16 अधिकारी, 10 तांडेल व 55 फायर फायटर यांची कुमक आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती. 9 फायर इंजिन त्यासाठी लावण्यात येऊन 16 हजार लीटर पाणीची क्षमता असलेले 22 ते 25 जंबो टॅंकर आतापर्यंत ताजची आग विझविण्यासाठी लागले. अद्यापही फायर ब्रिगेडचे जवान आग विझविण्याचे कार्य करत आहेत. गोळ्यांच्या वर्षावात आग आटोक्यात आणण्याचा बृहन्मुंबई फायर ब्रिगेडसाठी हा पहिलाच चि‍त्तथरारक अनुभव आला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi