रतन टाटांनी केली ताजची पहाणी
, सोमवार, 3 मे 2010 (15:54 IST)
एनएसजीच्या कमांडोंनी आज ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा केल्यानंतर लगेचच टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आज या हॉटेलची पाहणी केली. ताज ग्रुप हाही टाटा समुहाचाच एक भाग आहे. रतन टाटा यांच्याबरोबर ताज हॉटेलचे वरिष्ठ अधिकारी कृष्ण कुमार हेही होते. या हॉटेलमध्ये ५२९खोल्या आहेत आणि हे सर्व हॉटेल जवळपास साठ तास दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. अतिरेक्यांनी या हॉटेलची पार दुर्दशा केली आहे. मुंबईचे वैभव असणारे आणि १०५ वर्षाची अभिमानास्पद परंपरा सांगणारे हे हॉटेल उध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी आगी लागून काळेठिक्कर पडले आहे. दहशतवाद्यांनी घडवलेले स्फोट आणि कमांडोंबरोबरच्या चकमकीमुळेही हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी लागेलल्या आगी विझवण्यात फायर ब्रिगेडच्या अधिकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताज व जवळच असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये अनेक बड्या व्यावसायिकांचा मृत्यू झाला. त्यात येस बॅंकेचे अध्यक्ष अशोक कपूर, सुनील पारखे व बिल्डर पंकज शहा यांचा समावेश आहे. गौरवशाली ताज हॉटेल