Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

930 लोकल ट्रेन होतील रद्द, तीन दिवस मुंबई मधील लोकांना WFH करण्याचा सल्ला

local train mumbai
, गुरूवार, 30 मे 2024 (14:13 IST)
जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि लोकलमधून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा स्टेशन मधील प्लॅटफॉर्म विस्तार आणि बांधकाम चालू असल्याने 930 लोकल ट्रेन रद्द करण्यात आली आहे. 
 
मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म विस्तार बघत शुक्रवारी ते रविवार पर्यंतच्या सर्व 930 लोकल ट्रेन रद्द करण्याची घोषणा केली आहे. ठाण्यामध्ये गुरुवारी रात्रीपासून 63 तास काम सुरु होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये शुक्रवारी रात्रीपासून 36 तास काम सुरु होणार आहे. हे दोन्ही काम 2 जूनला पूर्ण होतील. 
 
सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनवर गर्दी जास्त प्रमाणात असते. मध्य रेल्वेने या ब्लॉक दरम्यान अतिरिक्त बस सेवांची मागणी केली आहे. तीन दिवसांपर्यंत, सीएसएमटी वर प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तारासाठी शेवटचे काम करण्यात येणार आहे. जेणेकरून 24 कोच असलेल्या ट्रेनला समायोजित करण्यात येईल. तसेच ठाणे प्लॅटफॉर्म 5/6 ला 2 ते 3 मीटर रुंदी वाढवली जाणार आहे. ज्यामुळे गर्दी कमी होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाबासाहेबांचा फोटो फाडल्यावरुन आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलन