Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर कारवाई

बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर कारवाई
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (08:08 IST)
मुंबईत जानेवारी २०२० ते मे २०२१ या कालावधीत बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त प्रवास करणाऱ्या २० हजार २३४ फुकट्या प्रवाशांकडून १३ लाख २ हजार ३३४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
बेस्ट उपक्रम अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे.नव्हे,बेस्ट उपक्रम विशेषतः बेस्ट परिवहन विभाग व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटका मोजत आहे. या बेस्टला मुंबई महापालिकेकडून ऑक्सिजनरुपी कर्ज व अनुदान यांचा पुरवठा सुरू असल्याने आतापर्यंत बेस्टचा श्वासोच्छ्वास सुरू आहे. 
 
त्यातच, बेस्टला गेल्या मार्च २०२० पासून ते आजपर्यंत कोरोनाचा चांगलाच आर्थिक फटका बसलेला आहे. त्यातून सावरण्यासाठी बेस्टला मुंबई महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र या कोरोना कालावधीतच बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त प्रवास करणाऱ्या २० हजार २३४ फुकट्या प्रवाशांकडून १३ लाख २ हजार ३३४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जे विना तिकीट पकडले गेले त्यांच्या कडूनच दंड वसुली करण्यात आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टीमचे कौतुक ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ कलाकारांना प्रदान