नवी मंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका 20 वर्षीय तरुणीचा खून केल्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गातून अटक केली आहे.त्याला उरण आणण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात नऊ मुंबईतील उरण रेल्वेस्थानका जवळ झुडपात एका तरुणीचा मृतदेह आढळला. खुनाचा तपास करण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
तपास करता करता पोलीस आरोपी दाऊद पर्यंत पोहोचली आणि त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून ताब्यात घेतले असून तो नातेवाईकांकडे लपून बसला होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे. दाऊद ने खून का केला अद्याप हे समजू शकले नाही.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
यशश्री शिंदे आपल्या कुटुंबासह उरण येथे राहत होती. ती एका खासगी कंपनीत कामाला जात होती.
25 जुलै रोजी ती कामावरून परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी रात्री दोन वाजता पोलिसांनी शेतात एक मृतदेह आढळल्याची माहिती देणारा फोन आला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यशश्रीच्या कुटुंबीयांना तिच्या शरीरावरील टॅटू आणि कपड्यावरून तिची ओळख पटली. तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "दाऊद शेखवर आमचा संशय आहे. 2019 साली त्याच्याविरुद्ध पाॅस्कोअंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला होता. तो आमच्या मुलीला त्रास देत होता. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे."