Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवंगत घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट

दिवंगत घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट
, गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (08:43 IST)
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयात हत्येचा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज घोसाळकर दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी ते बाहेर फिरायला जाणार होते. परंतु, त्याआधीच काळाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर घाला घातला आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर-दरेकर एकट्या पडल्या. आज व्हॅलेंटाईन दिनानिमित्त त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याच फेसबुक पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीला त्यांनी अधुरी एक कहाणी हे गाणेही जोडले आहे.
 
अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे वॉर्ड क्रमांक ७ चे नगरसेवक होते. त्यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर याही वॉर्ड क्रमांक १ मधून नगरसेवक राहिल्या आहेत. दोघेही राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. तेजस्विनी घोसाळकर या अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असत. प्रत्येक कार्यात दोघेही जोडीने काम करत, असे तेथील स्थानिक सांगतात. तसेच, हे जोडपे राजकारणात असले तरीही कुटुंबवत्सल होते.
 
अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांचा व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजे आजच लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिनाच्या निमित्ताने तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबुक वॉलवर एक स्टोरी शेअर केली आहे. ‘स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नव-यासाठी.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejughosalkar)

मला तुमच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे होते. परंतु, आता मला समजलं की तुम्हीच तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवणार आहात. मला माहितेय की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलेत आणि आता पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही वरूनही माझ्यावर असेच प्रेम करत राहाल. लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा. मला तुमची फार आठवण येते.
या स्टोरीमध्ये तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबरची काही खास क्षणचित्रेही शेअर केली आहेत. तसेच, अधुरी एक कहाणी…हे गाणेही या स्टोरीला जोडले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्कश्श आवाजाच्या डीजेला मनाई, शांतता कमिटी बैठक