Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर लँडस्लाइड, रेल्वे सेवा प्रभावित

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर लँडस्लाइड, रेल्वे सेवा प्रभावित
, सोमवार, 15 जुलै 2024 (11:51 IST)
मुंबई: महाराष्ट्रात मुंबई सोबत कोकण परिसरात मागील 48 तासांपासून पाऊस कोसळत आहे. या दरम्यान रायगढ आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसादरम्यान लँडस्लाइडमुळे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सांगितले जाते आहे की, हे  लँडस्लाइड संध्याकाळी पाच वाजता विन्हेरे (रायगढ) आणि दीवान खावती (रत्नागिरी) स्टेशन दरम्यान एक सुरंगच्या बाहेर झाले आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आली आहे.तर काही रेल्वेचे मार्ग बदलवण्यात आले आहे. काही रेल्वे रद्द झाल्यामुळे प्रवाश्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
 
कोकण रेल्वेच्या प्रवक्ताने सांगितले की, भूस्खलन संध्याकाळी पाच वाजता झाले. सुदैवाने कोणतीही रेल्वे त्या भागातून जात न्हवती. तसेच वेगवगेळ्या स्टेशनवर सूचना देऊन रेल्वे थांबवण्यात आल्या.
 
अधिकारींनी सांगितले की रूळ साफ करण्यासाठी कर्मचारी आणि मशिनी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. अधिकारी म्हणाले की जेसीबी घटनास्थळी पोहचले आहे. तसेच पोकलेन मशीन देखील येणार आहे. दोन तीन तासांत परत रेल्वे सेवा सुरु होईल.
 
सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी ‘रेड अलर्ट’ घोषित- 
मान्सून विभागाने रविवारी मुसळधार पावसाची शंका व्यक्त करीत महाराष्ट्राच्या कोल्हापुर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. मागील 24 तासांमध्ये मराठवाड़ा आणि विदर्भामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रच्या इतर तटीय क्षेत्रांच्या तुलनेत कमी पाऊस झाला. मान्सून विभागाने रविवारी या क्षेत्रांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनला ठाण्याजवळ आग, प्रवासी सुरक्षित