Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 17 March 2025
webdunia

ठाण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

arrest
, मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 (20:29 IST)
देशात महिला आणि मुली खरोखरच सुरक्षित नाही. महिलांवर अत्याचार वाढतच आहे. ठाण्यात शेजारी राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीवर 21 वर्षीय आरोपीने विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. आरोपीला अटक केली आहे. 
आरोपी व्यवसायाने शिंपी असून त्याने 8 फेब्रुवारी रोजी मुलीला बळजबरी कळवा परिसरातील भास्कर नगरच्या घरी नेले.आरोपीने मुलीच्या तोंडात कापड़ कोंबले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. नंतर मुलीने घडलेले सर्व आपल्या आईला सांगितले. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
ALSO READ: महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत यांनी केला दावा
आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 74 अंतर्गत महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देश्याने तिच्यावर हल्ला करणे आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला 9 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुकेश अंबानी चार पिढ्यांसह महाकुंभात पोहोचले, संगमात स्नान केले