Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलीस शिपाईचा मुंबई लोकलमधून पडून मृत्यू

death
, शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (10:23 IST)
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये धावत्या लोकलमधून पडल्याने पोलीस शिपाईचा मृत्यू झाला आहे. मुख्य बाब म्हणजे सात ते आठ तास जखमी अवस्थेत हे पोलीस शिपाई रेल्वे ट्रॅकवर पडलेले राहिले. मुसळधार पाऊस आणि गर्दीमुळे वेळेवर मदत मिळावी नाही यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार अमित ज्ञानेश्वर गोंदके वय 28 हे अंधेरी रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत आहे. अमित हे आपली ड्युटी संपल्यानंतर डोंबिवली मध्ये असलेले आपल्या घरी जाण्यास निघाले होते. त्यांनी रात्री अकरा वाजता अंधेरी वरून दादर आणि मग डोंबिवली करीत लोकल पकडली. तसेच गर्दी असल्यामुळे ते लोकलच्या दरवाज्यात उभे होते. पण गर्दी खूप असल्यामुळे ते मांडुप ते नाहूर रेल्वे स्टेशनच्या मध्ये लोकलमधून खाली कोसळले. पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा हात तुटला होता, डोक्याला मार लागला होता. तसेच ते जखमी अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर पडलेले राहिले. वेळीस उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
 
गुरुवारी सकाळी एका प्रवाशाने कुर्ला रेल्वे पोलीस मध्ये माहिती दिली की, एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर पडलेला आहे. कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अमित यांना तातडीने रुग्णालयात नेले पण त्यांना तिथे मृत घोषित करण्यात आले. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत पावसाचे पुनरागमन! महाराष्ट्र-बिहारमध्ये अलर्ट