Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत सुधारीत नवी नियमावली जाहीर,रात्रीची संचारबंदी उठवली

मुंबईत सुधारीत नवी नियमावली जाहीर,रात्रीची संचारबंदी उठवली
, मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (21:30 IST)
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या अटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहे. मुंबईत सोमवारी केवळ एक हजार रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत आजपासून सुधारीत नवी नियमावली  जाहीर झाली आहे. तर मुंबईतली सर्व पर्यटन स्थळही खुली होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
 
असे असतील नवे नियम
मुंबईत रात्रीची संचारबंदी उठवली
मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार
स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल
चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार
स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू
रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू
धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी
लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा कायम : अजित पवार