अंडरवर्ल्ड कुविख्यात डॉन अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी ही माहिती दिली आहे. दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती
अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
“पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. .
प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी
उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु आहे.