दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार मुंबईत चार दिवस ठिय्या आंदोलन करणार आहे. येत्या 23 जानेवारी ते 26 जानेवारी असे चार दिवस हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या राज्यातील पाच संघटना करणार आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी सर्व राज्यांच्या राजधानीत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तसेच येत्या 18 जानेवारीला किसान महिला दिवस देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे.