कोरोना विषाणू संदर्भात अधिक दक्षता घेण्यासाठी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज गुंडाळले जाणार आहे. यासंदर्भतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत दिली होती. त्यानुसार शनिवार अधिवेशनाचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी अधिवेशनात कोणता मुद्दा गाजणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या खेरच्या दिवशी आज विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यामुळे सीएए, एनआरसी आणि एनपीआर हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर विरोधकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सत्ताधारी कसे सामोरे जाणारे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.