Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रंग खेळताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

रंग खेळताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू
, शनिवार, 19 मार्च 2022 (11:58 IST)
काल धुळवडीचा सण  सर्वत्र उत्साहात साजरा झाला. लहान मुलांसह मोठ्यांनी देखील धुळवडीच्या सणाचा आनंद घेतला. मात्र अंबरनाथला या सणाला गालबोट लागणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. अंबरनाथ येथे शिवाजीनगर परिसरात धुळवडीला मित्रांनी रंग लावू नये म्हणून गच्चीवर जाऊन बसलेल्या एका तरुणाचा पाय घसरून गच्ची वरून पडून दुर्देवी मृत्यू झाला. अविनाश पाटील (26) असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
अंबरनाथ पूर्व येथे राहणाऱ्या अविनाश पाटील धुळवडीच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास शिवाजी नगर येथे एका बांधकाम होत असलेल्या इमारतीखाली लहान भावासह उभा असताना त्यांचे काही मित्र त्यांना रंग लावण्यासाठी आले असता रंग लावण्याच्या भीतीने अविनाश आणि त्याचा भाऊ समोरच्या इमारतीत लपण्यासाठी गेले. अविनाशचा  भाऊ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाऊन लपला.पण त्यांच्या मित्राने त्याला शोधले आणि रंग लावून खाली आणले. परंतु अविनाश हा गच्चीवर जाऊन लपला. 

अविनाश चा भाऊ आणि त्याचे मित्र खाली आले असता त्यांना अविनाश इमारतीच्या गच्ची वरून खाली जमिनीवर पडल्याचा आवाज आला. अविनाश गच्चीवरून कसा काय पडला? त्याचा तोल गेला ? किंवा गच्चीवर कोणी होते का ? या संदर्भात अद्याप माहिती मिळाली नाही. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी मयताचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हास नगर रुग्णालयात पाठवले आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून या घेणेची नोंद झाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टेम्पोच्या अपघातात 3 ठार, 1 जखमी