Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: पोलिसांच्या तपासावर जिशान सिद्दीकी नाराज, म्हणाले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार

zeeshan siddique
, शुक्रवार, 10 जानेवारी 2025 (08:55 IST)
Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी मुंबईचे सहआयुक्त यांना भेटण्यासाठी आयुक्त कार्यालयात पोहचले. जिशान सिद्दीकी म्हणतात की त्यांना वाटत नाही की पोलिस तपासाची दिशा योग्य आहे. एसआरएच्या दृष्टिकोनातून काहीही आढळले नाही म्हणून जिशान तपासावर खूश दिसत न्हवते.   
मिळालेल्या माहितीनुसार एसआरए लॉबी आणि बिल्डर्सची नावे तपासात समाविष्ट नसल्यामुळे झीशान पोलिसांच्या तपासावर नाराज असून याच कारणास्तव, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, जिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर जिशान सिद्दीकी सतत नाराजी व्यक्त करत आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलिसांच्या जॉइंट सीपी क्राइमची भेट घेतली. बैठकीनंतर बाहेर पडताना झीशान सिद्दीकी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्वांवर कारवाई करू आणि न्यायालयातही उत्तर द्यावे लागेल. जेव्हा तुम्हाला आधीच माहित होते की आमचे कुटुंब धोक्यात आहे. या प्रकरणात एसआरए लॉबी आणि कोणत्याही बिल्डरचे नाव का नाही? या प्रकरणात मी माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे माझ्या वडिलांचे मित्र होते यांना भेटेन असे देखील जिशान सिद्दकी म्हणाले.

Edited by- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत काँग्रेस एकटी पडली, उद्धव ठाकरेंनी सपाप्रमाणे केजरीवालांना पाठिंबा दिला