बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकांनी आज सिमला येथे शूटींग पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केली, अशी तक्रार स्थानिक लोकांनी केली आहे.
सिमला येथे सुरू ‘शू बाइट’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमिताभ बच्चनची एक झलक पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी व पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. तेव्हा, सुरक्षा रक्षकांनी लोकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
यावेळी शूटींग करताना सावधगिरी बाळण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शूटींग करणार्या यूनिटला दिला आहे.