Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nagaland Election 2023:लोक जनशक्ती पक्ष नागालँड विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार

Nagaland Election 2023:लोक जनशक्ती पक्ष नागालँड विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार
, सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (22:22 IST)
लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) नागालँड विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाने पहिल्या 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेउर्वरित इतर उमेदवारांची यादी पक्ष यापुढे प्रसिद्ध करेल. उमेदवार ‘हेलिकॉप्टर’ या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. 
 
पक्षाकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, LJP (Ra) फक्त अशाच जागा लढवणार आहे जिथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केलेला नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. चिरागने ट्विटमध्ये लिहिले की, 'लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने नागालँडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेल्या विधानसभा जागांवर पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही. 
 
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये याच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याठिकाणी राजकीय पक्षांनीही आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. नागालँडमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष टेमजेन इमना यावेळी अलंगटाकी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. 
 
निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.तिन्ही राज्यांमध्ये गेल्या वेळेप्रमाणे दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला एकाच वेळी मतदान होणार आहे.  तीनही राज्यांचे निकाल 2 मार्चला लागणार आहेत. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे, तर मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.  

नागालँडमध्ये 2315, मेघालयात 3482 आणि त्रिपुरामध्ये 3328 बूथ आहेत शाळांमध्ये बांधलेल्या सर्व बूथवर बसण्यासाठी शौचालये, वीज, खुर्ची टेबल फर्निचरची व्यवस्था केली जाईल. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी व्यवस्था करेल आणि नंतर त्या शाळांना भेट म्हणून देईल. 

Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tripura Election 2023: 'पूर्वी ईशान्य बॉम्बस्फोटांनी हादरायचे, आता विकासाचा आवाज येतो -अमित शाह