श्रीनगर- जिहादच्या मार्गाने काश्मीरला भारतापासून आझादी मिळेल अशा चिथावणी देणा-या ऑडीयो कॅसेटस काश्मीर खो-यातील मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन ऐकवल्या जात आहेत. भारत विरोधी जिहादमध्ये सहभागी होण्याचे युवकांना आवाहन केले जात आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. दोन दिवसात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २२ जण ठार झाले आहेत.
रविवारी जमावाने पोलिसांची गाडी झेलम नदीत ढकलून दिली. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला. रविवारी एकूण पाचजण ठार झाले. काश्मीर खो-यातील मशीदींमधून भारत विरोधी नारे देण्याची ही पहिली वेळ नाही.
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. एक प्रकारे मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन हिंसाचारासाठी जाहीर चिथावणी दिली जात आहे. जिहादच्या मार्गाने काश्मीरला भारतापासून आझादी मिळेल अशा चिथावणी देणा-या ऑडीयो कॅसेटस ऐकवल्या जात आहेत.