अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. 1993 मधील मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर दाऊदचे नाव भारताच्या मोस्ट वॉंटेड यादीत आले आहे. मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात मंगळवारी झालेल्या शिखर परिषदेत हा निर्णय झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसाच पाच दिवसीय अमेरिका दौरा आटोपला. अमेरिकेने पहिल्यांदाच दाऊदच्या डी. कंपनीचाही दहशतवादी नेटवर्कच्या यादीत समावेश केला आहे. या यादीत जैश-ए-मुहम्मद, लष्कर-ए-तैयबा आिण हक्कानी नेटवर्क या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा यापूर्वीच समावेश आहे.
आता भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी दहशतवादी नेटवर्कची सुरक्षित स्थळे नष्ट करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.