Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलगा-सुनेच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी- गीतकार आनंद

मुलगा-सुनेच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी- गीतकार आनंद
नवी दिल्ली , शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014 (16:44 IST)
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा आणि सुनेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. मुलगा - सुनेच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मा‍गणी, संतोष आनंद यांनी केली आहे. या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून मागवला आहे. 
 
संकल्प आनंद हे लोकनायक जयप्रकाश नारायण नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेंन्सिक सायन्समध्ये लेक्चरर म्हणून काम करत होते. ही संस्था केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आख्त्यारित येते. घटनास्थळी मिळालेल्या सुसाइड नोट त्यांना कामाच्या ठिकाणचे काही सहकारी त्रास देत होते, असा अंदाज बांधला जात आहे. एका तपास अधिका-याने हे प्रकरण आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचचे बोलले जात आहे. 
 
दरम्यान,संकल्प यांनी बुधवारी पत्नी व मुलीसह आग्रा-दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेससमोरउडी घेतली होती. यात पती-पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांची पाच वषीय मुलगी गंभीर जखमी झाली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi