Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रपती भवनात डेंग्यूचे डास!

राष्ट्रपती भवनात डेंग्यूचे डास!
दिल्ली , सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (11:23 IST)
राष्ट्रपती भवनात यंदाही डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. दिल्लीतील अनेक दूतावासांच्या परिसरातही डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेनं डेंग्यूच्या डासांचं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. त्यानंतर या नोटिसा राष्ट्रपती भवनाला पाठवल्या आहेत. 

यासंदर्भात दिल्ली महापालिकेनं जानेवारी महिन्यापासून राष्ट्रपती भवनाला 50 नोटीसा पाठवल्या आहेत. गेल्या वर्षीही तब्बल 125 नोटीसा पाठवूनही राष्ट्रपती भवनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. भवनाच्या 320 एकर परिसरात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात अळ्या आढळून आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही न खाता 20 वर्षापासून पाण्यात राहते ही महिला