नवी दिल्ली- भारतीय दूतावासाने मार्च महिन्यात लिबिया येथे अपहरण करण्यात आलेल्या भारतीयाची सुटका केल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. स्वराज यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
‘भारतीय दूतावासाने रेगी जोसेफ या भारतीयाची लिबियातून सुरक्षितपणे सुटका केली आहे. यावर्षी मार्चमध्ये त्यांचे अपहरण करण्यात आले होते‘ अशी माहिती स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच स्वराज यांनी लिबियातील भारताचे राजदूत खान यांनी जोसेफच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले.
43 वर्षाचे जोसेफ हे लिबियाची राजधानी त्रिपोली येथे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होतला.