दिल्लीत डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, आता एका सहा वर्षाच्या मुलाला डेंग्यूमुळे जीव गमवावा लागला आहे.
अमान या सहा वर्षाच्या मुलाला शनिवारी डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याला त्यावेळी कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेतले नव्हते. अखेर मंगळवारी त्याचा पुरेशा उपचाराअभावी मृत्यू झाला. अमानचे वडील मनोज शर्मा यांनी त्याला वाचविण्यात अपयशी ठरलो, अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयीन चौकशीचे आदेश
डेंगूच तापामुळे दिल्लीच एका हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सात वर्षाचा मुलगा अविनाश राघव याच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश ‘आप’ सरकारने पारित केल्याचे एका प्रवक्त्याने स्पष्ट केले. या मुलाला दिल्लीतील पाच हॉस्पिटलनी दाखल करून घेण्याला नकार दिला होता. परंतु अखेर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी त्याला दाखल करून घेण्याला भाग पाडल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.