Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘नीट’ परीक्षेनुसारच होणार मेडिकल प्रवेश

‘नीट’ परीक्षेनुसारच होणार मेडिकल प्रवेश
नवी दिल्ली , मंगळवार, 10 मे 2016 (10:45 IST)
प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या सीईटी होणार नाहीत, देशभरातील मेडिकल अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेनुसारच होणार, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. तसेच ‘नीट’ न दिलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देता येईल, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.
 
‘नीट’ राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘ऑल इंडिया प्री-मेडिकल एंट्रन्स टेस्ट’ (एआयपीएमटी) ही परीक्षा यंदा ‘नीट’ या नावाने घेतली गेली. 1 मे रोजी राज्यातील सुमारे 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा दिली होती. तर राज्य सरकारने घेतलेली सीईटी परीक्षा सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.
 
केवळ ‘नीट’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच मेडिकलसाठी प्रवेश मिळेल असे, न्यायालयाने स्पष्ट केले. ‘सीईटी’ आणि ‘नीट’ या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रङ्क वेगवेगळा असल्याने आठ राज्य सरकारांनी या परीक्षेला विरोध केला होता.
 
आता मात्र सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी ‘नीट-2’ परीक्षा देता येईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी एक मे रोजी झालेली ‘नीट-1’ परीक्षा दिली आहे. त्यांना पुन्हा 24 जुलै रोजी होणारी परीक्षा देता येईल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचे ‘नीट-1’चे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर पालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने 29 एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयामध्ये 2016-17च्या मेडिकल अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेच्या माध्यमातूनच होतील असे स्पष्ट केले होते. ही परीक्षा एक मे आणि 24 जुलै अशा दोन टप्प्यात होईल, असे न्यायालयाने म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हाट्सपमध्ये लवकरच येऊ शकत व्हिडिओ कॉलिंगचे फीचर