rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोळसा खाणीत स्फोटात 7 मजुरांचा मृत्यू

West bengal
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीत मोठा स्फोट झाला असून अपघातात खाणीत काम करणाऱ्या आत मजुरांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. 

सदर घटना पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे भादुलीया ब्लॉक मधील कोळसा खाणीत आज सकाळी घडली. कोळसा खाणीत नियोजित स्फोटांसाठी डिटोनेटर घेऊन जाताना हा स्फोट झाला.घटनास्थळी बचावकार्य आणि मदतकार्य सुरु आहे. 
 
WBPDCL चा दावा आहे की, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10:30 च्या सुमारास हा स्फोट झाला. अपघातास्थळीहुन आता पर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेच्या कोको गॉफने चायना ओपनचे विजेतेपद पटकावले