Jharkhand News : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील खुंटी जिल्ह्यातील जंगली भागात एका तरुणाने आपल्या प्रियसीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 50 हून अधिक तुकडे केले. हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला जेव्हा लोकांनी कुत्र्याला मानवी हात खातांना पाहून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना खुंटी येथील एका छोट्या टेकडीजवळ मृतदेह आणि शरीराचे अवयव विखुरलेले आढळले. या घटनेतील आरोपी 25 वर्षीय असे असून तो खुंटीच्या जोजोदाग गावचा रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.