Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राची 3 वेगळी राज्ये करणार, भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याचें वक्तव्य !

narendra modi
, शुक्रवार, 24 जून 2022 (17:55 IST)
सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर कर्नाटकाच्या मंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे विभाजन केले जाईल, तर यूपीचे चार भाग केले जातील, असे वक्तव्य बार काउन्सिलच्या बैठकीत कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांनी दिले. देशात एकूण 50 राज्ये निर्माण करण्यासाठी मोदी सरकार मध्ये चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
 
कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी म्हणाले की, त्यांना उत्तर कन्नडला  हे वेगळे राज्य करायचे होते हे खरे आहे.ते म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकून एकदा पंतप्रधान मोदी सत्तेत परत आले की कर्नाटक चे दोन आणि महाराष्ट्राचे३ राज्यात  विभाजन होईल, तर उत्तर प्रदेशचे चार राज्य केले जातील.
 
ते म्हणाले, 'ही आमच्या पक्षाची भूमिका नाही, पण यावेळीही तशीच असली पाहिजे.आपण सर्वांनी संघटित होऊन हे करूया.आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत येतील.महाराष्ट्राचे तीन भाग केले जातील, कर्नाटकचेही दोन भाग केले जातील आणि उत्तर प्रदेशचे चार भाग केले जातील.एकूण 50 राज्ये निर्माण करण्याची चर्चा सोशलमिडीयावर सुरू आहेत.2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यासंदर्भात महत्त्वाची पावले उचलतील, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे बंड: महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की - उदयनराजे भोसले