ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) च्या दोन्ही गटांचे नेते के. पलानीसामी आणि ओ. पन्नीरसेल्वम अखेर एकत्र आले आहे. दोन्ही नेत्यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी हात उंचावून ते एकत्र आले असल्याचे सुचित केले. पक्षाला कोणी एक नेता असणार नाही. यावेळी मुख्यमंत्री पलानीसामी म्हणाले, पक्षाचा कारभार 11 सदस्यांची समन्वय समिती पाहिली. पनीरसेल्वम उपमुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्याकडे अर्थखाते देण्यात येणार आहे.
यावेळी के. पलानीसामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पन्नीरसेल्वम हेच आमचे संयोजक असणार आहेत. मी सह-संयोजक आणि मुन्नूसामी हे उप-संयोजक असतील. आमची पहिली जबाबदारी ही पक्षाला मजबूत करण्याची असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच माझ्यानंतर एआयएडीएमके 100 वर्षे चालेल असे अम्मांचे स्वप्न होते. ते स्वप्न खरे करुन दाखवू असे पलानिस्वामी यांनी म्हटले.
जयललितांच्या मृत्यूनंतर पक्षातील घडामोडी
– पक्षाच्या नेत्या जयललिता यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले होते. त्यानंतर ओ. पनीरसेल्वम मुख्यमंत्री झाले होते. मात्र काही महिन्यातच पक्षात शशिकला यांना मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्न सुरु झाले.
– 65 दिवसांनंतर 5 फेब्रुवारी रोजी पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी बंडखोरी केली होती. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
– त्यानंतर पलानीसामी यांना विधीमंडळ पक्षाचे नेतेपद मिळाले आणि ते मुख्यमंत्री झाले होते.