असं म्हणतात दैव तारी त्याला कोण मारी. असेच काहीसे प्रत्यक्षात घडले आहे बिहारच्या पाटणा जवळ बाढ रेल्वे स्थानकावर. एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बोगीत चढताना पाय घसरून रुळावर जाऊन पडली. दरम्यान ट्रेन सुरु झाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकला आता पुढे काय होणार असे सगळे विचारात होते. महिलेने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ घेतले आणि गुपचूप पडून होती. तिच्या वरून ट्रेन निघाली. ट्रेन गेल्यावर ती सुखरूप असल्याचं पाहून लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. लोकांनी महिलेला आणि तिच्या मुलांना रुळावरून बाहेर काढले.
वास्तविक बेगुसराय येथील रहिवासी असलेले एक कुटुंब दिल्लीला जाण्यासाठी बरह स्टेशनवर पोहोचले होते. येथे भागलपूरहून दिल्लीला जाणारी विक्रमशीला एक्स्प्रेस शनिवारी संध्याकाळी बरह स्थानकावर पोहोचली. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. स्टेशनवर उपस्थित असलेले लोकही त्यावर चढू लागले.
गर्दीला भेदून ही महिला आपल्या दोन मुलांसह ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्नात असताना रुळावर पडली. लोक तिला बाहेर काढतील तो पर्यंत ट्रेन सुरु झाली.
महिला आपल्या मुलांना छातीशी कवटाळून तशीच पडून राहिली. या अपघातात ते तिघेही सुखरूप बचावले. नंतर ट्रेन गेल्यावर त्यांना रुळावरून बाहेर काढण्यात आले. त्यांना सुरक्षित पाहून लोकांनी देवाचे आभार मानले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.