Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे करत आहे लोकं ब्लॅक मनी व्हाईट

असे करत आहे लोकं ब्लॅक मनी व्हाईट
भारतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून 1000 आणि 500 च्या नोटा बंद केले आहे तेव्हापासून ब्लॅक मनी ठेवणार्‍यांची झोप उडाली आहे. ज्या कमाईचा हिशोब सरकारला देण्यात येत नसेल अश्या पैशांना ब्लॅक मनी असे म्हणतात. परंतू लोकं आता ब्लॅक मनी व्हाईट करण्याचे उपाय शोधत आहे. अनेक लोक सध्या नवीन-नवीन उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
 
नवीन गाडी खरेदी केली तर एवढा पैसा कुठून आला याचे उत्तर देणे कठिण होईन म्हणून लोकं सेंकड हैंड गाड्या त्याच्या किमतीचीपेक्षा अधिक भावात खरेदी करत आहे. सेंकड हैंड टू- व्हीलर किमतीपेक्षा 25 हजार पर्यंत तर फोर व्हीलरचे दीड लाख अधिक पर्यत विकल्या जात आहे.
कमी किमतीच्या प्रापर्टी कागदावर अधिक मूल्यावर खरेदी आणि विक्री केल्या जात आहे. ज्यानेकरून ब्लॅक मनी व्हाईटमध्ये परिवर्तित होऊ शकेल.
 
नातेवाइकांकडून गिफ्ट मिळाले असे सांगून ही लोकं आपली मनी व्हाईट करत आहे. कारण भेट म्हणून प्राप्त झालेली राशी आयकराहून मुक्त आहे. 
 
सोनं चांदीची खरेदी करूनही लोकं आपले धन खपवण्याचे प्रयत्न करत आहे.
 
सरकारच्या या पाउलामुळे सध्या गूगलवरही हेच ट्रेड होत आहे की ब्लॅकमनी परिवर्तित कशी करावी. हे सर्च करण्यात हरयाणा, गुजरात, पंजाब आणि दिल्लीचे लोकं सर्वात पुढे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर आनंद शर्मा यांचे भाषण सुरु