Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेशनकार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे गिफ्ट

ration card
, रविवार, 12 मार्च 2023 (16:52 IST)
Ration Card Holders Update : शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुमच्याकडेही जर रेशनकार्ड असेल तर मोफत रेशनसोबत तुम्हाला आता केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष सुविधा मिळणार आहेत. 
मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्या सर्व कुटुंबांना आणखी एक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.जिल्हा व तहसील स्तरावरही विशेष मोहीम राबविली जात आहे. 

केंद्र सरकारने गरिबांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने या अभियानाअंतर्गत अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्यमान कार्ड बनवण्याचे उद्दिष्टये ठेवले आहे. ज्यांचे आयुष्यमान कार्ड बनले नाही ते या योजनेअंतर्गत जिल्हा आणि तहसील कार्यालयात जाऊन कार्ड बनवून घेऊ शकतात . पात्र असणारे लाभार्थी जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान योजनेशी जोडली गेलेली खाजगी रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवू शकतात.या आयुष्मान कार्डमुळे आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास उपचार त्वरित मिळेल. अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतची आणि इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबांना 50 हजार रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत या योजनेअंतर्गत मिळेल. जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना शासनातर्फे सूचना देण्यात आल्या आहे. 


Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इस्रायलमध्ये होतंय आजवरचं सगळ्यात मोठं आंदोलन