दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाराऊस ॲव्हेन्यू कोर्टाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता केजरीवाल 15 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार आहेत.केजरीवाल यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 5 मध्ये ठेवले जाऊ शकते. या बाबत तिहार तुरुंगात उच्च स्तरीय बैठकही झाली आहे. कोठडी संपल्यानंतर ईडीने सोमवारी केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडीची मागणी ईडी ने केली.
ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू न्यायालयात हजर झाले. नी न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल त्यांच्या मोबाइल फोनचा पासवर्ड उघड करत नाहीत. ईडीने न्यायालयाला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी डिजिटल उपकरणांचे पासवर्ड उघड केलेले नाही.
अरविंद केजरीवाल यांनी भगवत गीता, रामायण, हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड्स ही पुस्तके जेलमध्ये ठेवण्याची परवानगी मागितली आहे. कारागृहात धार्मिक लॉकेट घालण्याचीही परवानगी मागितली आहे. याशिवाय औषध आणि विशेष आहाराचीही मागणी करण्यात आली आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह, आप नेते विजय नायर आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन हे देखील तुरुंगात आहेत.