Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष, अशोक गेहलोत समर्थक आमदारांचं वेगळच बंड

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष, अशोक गेहलोत समर्थक आमदारांचं वेगळच बंड
, सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (10:56 IST)
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सचिन पायलट यांचे समर्थक आमदार त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. ज्या गटाने सरकार वाचवलं त्याच गटाचा मुख्यमंत्री असावा अशी त्यांची भूमिका आहे. रविवारी (25 सप्टेंबर) रात्री उशिरापर्यंत राजस्थान काँग्रेसमध्ये यावरून खलबतं सुरू होती.
 
अशोक गहलोत यांच्या समर्थक आमदारांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी गहलोत समर्थक आमदारांनी त्यांची भेट घेतली.
 
सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार, मंत्री शांती धारीवाल, प्रताप सिंह खाचरियावास, अपक्ष आमदार संयम लोढा यांच्यासह अनेक आमदार रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले. या ठिकाणी बैठकीत तिढा सोडवण्याबाबत चर्चा झाली.
 
तत्पूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हॉटेल मेरिएटमध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांची भेट घेतली.
 
वृत्तसंस्था एएनआयनं काँग्रेस आमदार प्रताप सिंह खाचरियावास यांच्या हवाल्यानं म्हटलंय की, "केवळ 10-15 आमदारांचंच ऐकलं गेलंय आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पक्षाला आमचे ऐकायचं नाहीये आणि त्याशिवाय निर्णय घेतले जात आहेत."
 
रविवारी दिवसभर काय घडलं?
काँग्रेसचे आमदार जयपूरममध्ये विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्या निवासस्थानी पोहचले.
 
"सर्व आमदार नाराज असून राजीनामा देत आहेत. त्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे जाणार आहोत. मुख्यमंत्री अशोक गहलोत सल्लामसलत न करता निर्णय कसा घेऊ शकतात यावर आमदार नाराज आहेत," असं काँग्रेस नेते प्रताप सिंह खाचरियावास यांनी काही वेळापूर्वी म्हटलं.
 
"अशोक गहलोत यांनी आमदारांच्या सूचनांकडे लक्ष द्यावं. आमच्यासोबत 92 आमदार आहेत," असंही खाचरियावास यांनी म्हटलंय.
 
दरम्यान, रविवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs AUS 3rd T20: एका रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली