चेन्नई वरून मुंबईसाठी उड्डाण करणारे IndiGo विमान मध्ये बॉंबच्या बातमीमुळे गोधळ उडाला. विमानाच्या क्रू मेंबर ला चिट्ठी मिळाली ज्यामध्ये विमानाला बाँबने उडवण्याची धमकी दिली होती.
IndiGo विमानाच्या क्रू मेंबरला एक नोट मिळाली त्या मध्ये लिहले होते की, डू-नॉट लँड बॉंबे....यू लँड बाँब ब्लास्ट ! ही नोट मिळताच लागलीच सुरक्षा एजन्सीला सूचना देण्यात आल्या. शनिवारी सकाळी 8.40 वाजता मुंबई एयरपोर्टवर आपत्काल घोषित करण्यात आला.
बाँबची बातमी मिळताच सर्वात पहिले IndiGo विमानामध्ये प्रवास करत असलेल्या लोकांना सुरक्षित उतरवण्यात आले आणि विमानाची झडती घेण्यात आली.
यापूर्वी दिल्लीवरून बनारसला जाणाऱ्या विमानाला देखील अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीवरून श्रीनगरला जाणार्या विमानामध्ये देखील असेच प्रकरण घडले होते. पण नंतर दोन्ही धमकी अफवा निघाली.
Edited By- Dhanashri Naik