Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लखनौमध्ये अवैध गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी मोठा स्फोट

लखनौमध्ये अवैध गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी मोठा स्फोट
, शनिवार, 7 डिसेंबर 2024 (11:27 IST)
Lucknow News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला आहे. शुक्रवारी अवैध गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या स्फोटात एकूण ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबग्गा परिसरात स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी सांगितले की, 4 जण जागीच गंभीर जखमी झाले असून शेजारी राहणारी 2 लहान मुलेही जखमी झाली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.  
 
तसेच पोलिसांनी या प्रकरणात 96 सिलिंडर जप्त केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्रातील आमदार विधान भवनात पोहोचले