Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयपूर-अजमेर महामार्ग अपघातात आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 16 वर पोहोचला

जयपूर-अजमेर महामार्ग अपघातात आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 16 वर पोहोचला
, बुधवार, 25 डिसेंबर 2024 (12:02 IST)
Jaipur Ajmer Highway Accident News: राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेत मृतांची संख्या वाढत आहे. काल 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. आता आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघातात गेल्या शुक्रवारीच 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा आकडा दररोज वाढत आहे. एमएस मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले की, सध्या 18 लोक रुग्णालयात दाखल आहे, त्यापैकी 3-4 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील तीन जण व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वैद्यकीय पथक पूर्णपणे सक्रिय असून सर्व जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहे.  

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र