जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत. डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.
अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराव आणि शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली.
डोडाच्या उत्तरेकडील सामान्य भागात लष्कर आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित झाला, त्यानंतर जोरदार गोळीबार झाला.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडामध्ये अवघ्या 24 तासांपूर्वी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता . ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.