Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बनावटी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, यूपीसह चार राज्यात एनआयए ची धाड

NIA
, शनिवार, 2 डिसेंबर 2023 (22:58 IST)
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशसह देशातील चार राज्यांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये बनावट नोटा, चलन छापण्याचे कागद, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट जप्त करण्यात आले. 
 
NIA अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 489B, 489C आणि 489D अंतर्गत 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या एका प्रकरणाच्या (RC-02/2023/NIA/BLR) तपासाचा भाग म्हणून छापा टाकण्यात आला.
 
हे प्रकरण FICN (भारतीय चलनी नोटांची) सीमापार तस्करी आणि भारतातील विविध राज्यांमध्ये तिच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी संशयित व्यक्तींनी रचलेल्या मोठ्या कटाशी संबंधित आहे. एनआयएच्या पथकांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर आणि महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकमधील इतर ठिकाणी छापे टाकले.

Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs AUS 5th T20 : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूत