Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्र सरकार करून या योजने अंतर्गत 5 वर्षांसाठी मोफत धान्य मिळणार!

Ration
, रविवार, 17 मार्च 2024 (14:21 IST)
लोकसभा निवडणुकीच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्या असून निवडणूक सात टप्प्यात घेतली जाणार आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर केंद्र सरकार लोक  कल्याणकारी  योजनांची  सुरुवात करत आहे. जेणे करून देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचणार. ही योजना पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत राबविली जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील 81 कोटी जनतेला पाच वर्ष म्हणजे 2028 पर्यंत मोफत रेशन उपलब्ध करून देणार आहे. केंद्र सरकारने ही योजना नोव्हेम्बर 2023 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेतला.या योजनेमुळे केंद्र सरकारवर भार पडणार आहे. ही योजना कोरोनाकाळात पहिल्या 3 महिन्यांसाठी सुरु केली होती. मोफत रेशन योजने अंतर्गत गरीब आणि गरजू परिवारांना माहियाचे 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू मोफत देण्यात येते तसेच डाळी देखील प्रत्येक परिवाराला मोफत दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिवाराकडे वैध रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. ही योजना सरकारी असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू आहे. गरजू आणि गरीब नागरिकांना अन्न सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरु आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे पाटीलच्या विरोधात पाच गुन्हे दाखल