पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली. तसेच, गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचंही एसआयटीने सांगितले आहे. वाघमारे याने गौरी लंकेश यांना गोळी मारली. तसेच, याच शस्त्राने गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांचीही हत्या करण्यात आली. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या, त्या गोळ्यांच्या मागील बाजूस एकसारख्याच खुणा आढळल्या, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेले हे शस्त्र मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.