Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपाच्या वाटेवर नाही: गुरुदास कामत

भाजपाच्या वाटेवर नाही: गुरुदास कामत
काही प्रसार माध्यमातून काँग्रेसचे माजी केंद्रीमंत्री व माजी खासदार गुरुदास कामत हे भाजपात जाणार, अशा आशयाच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. मात्र कामत यांनी या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. आपल्याला पक्षाच्या सर्व पदांच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती आपण स्वतः काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना केली होती, त्याआधारे भाजपात जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी यांना भेटल्यानंतर शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०१७ रोजी आपण जाहीररीत्या फेसबुक आणि ट्विटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत आपण स्पष्ट संकेत दिले होते. जे  राजकारण जाणतात त्यांच्यासाठी ट्विट क्रमांक ३/५  मध्ये स्पष्ट नमूद केले आहे. ३ फेब्रुवारी हा असा सहवास होता की या दिवशी मुंबईतील काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर केली गेली आणि २१ तारखेला मतदान होते. याव्यतिरिक्त कामत यांनी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता. ज्यात ते पक्षाच्या सर्व पदांच्या आणि जबाबदारीतून मुक्त होण्याच्या आपला निर्धार कायम असल्याचे अधोरेखीत होते.
 
त्यामुळे श्री. अशोक गेहलोत यांना सरचिटणीस व गुजरातचे प्रभारी आणि चार सचिवांची नियुक्ती याच्याशी कामत यांच्या निर्णयाचा संबंध जोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण ३ फेब्रुवारीपासून ते आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी करीत होते.
 
माझ्या ठाम भूमिकेनंतरही अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून मी अजूनही पक्षाचा सरचिटणीस आणि राजस्थानचा प्रभारी म्हणून राहावे, अशी घोषणा केल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा आभारी असून त्यांना धन्यवाद देतो, असे कामत यांनी म्हटले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साल्याने काढला मेहुण्याचा काटा