Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले आयएएस अधिकारी

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले आयएएस अधिकारी
, शुक्रवार, 27 मे 2022 (10:00 IST)
आयएएस अधिकारी संजीव खिरवार दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर कुत्र्याला फिरवल्याबद्दल वादात सापडले आहेत, पण कदाचित संजीव खिरवार यांनी कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना विचार केला नसेल की या सवयीमुळे आपल्याला कुटुंबापासून 3500 किमी दूर जावे लागणार. वाद वाढल्यानंतर आयएएस संजीव खिरवार यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली आहे.तर  त्यांची पत्नी रिंकू धुग्गा यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे.
 
दोन्ही राज्यांमध्ये सुमारे 3,465 किमीचे अंतर आहे.ते दोघे आधी दिल्लीत पोस्ट केले होते.  संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या दिल्लीचे महसूल आयुक्त म्हणून कार्यरत होते.  
 
प्रकरण काय आहे ?
दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका प्रशिक्षकाने दावा केला होता की, पूर्वी तो रात्री 8 ते 8.30 वाजेपर्यंत सराव करत असे. पण आता त्यांना 7 वाजता मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे जेणेकरून IAS अधिकारी संजीव खिरवार आपल्या कुत्र्यासोबत तिथे फिरू शकतील. यामुळे त्याच्या प्रशिक्षणात आणि सरावात अडचणी येत असल्याचे प्रशिक्षकाने सांगितले.
 
त्यागराज स्टेडियमशी संबंधित प्रशिक्षक आणि खेळाडूंनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या. यामुळे त्याच्या प्रशिक्षणात आणि सरावात अडचणी येत असल्याचे प्रशिक्षकाने सांगितले होते. ते  म्हणाले  की पूर्वी ते 8.30 पर्यंत किंवा कधी कधी 9 पर्यंत सराव करत असे. ते दर अर्ध्या तासाने ब्रेक घ्यायचे. पण आता ते करू शकत नाही. त्यातील काही जण असे आहेत की ज्यांना 3 किमी दूर असलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सरावासाठी जावे लागत आहे. 
 
हे प्रकरण मीडियात आल्यानंतर वाद अधिकच वाढला होता. यानंतर केंद्र सरकार कडून कारवाई करण्यात आली.
केंद्र सरकारने आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची लडाखला आणि त्यांच्या पत्नीची अरुणाचल प्रदेशात बदली केली.मुख्य सचिवांनी या प्रकरणाचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

China Corona Crisis: लॉकडाऊन मुळे शांघायला आर्थिक संकट