देवी अहिल्याबाई होळकर अंतरराष्ट्रीय एयरपोर्टहून लवकरच गुजरातचे प्रमुख शहर सूरत आणि महाराष्ट्रातील पुणेसाठी उड्डाण सुरू होईल. खासगी एयरलाईन्स फ्लायबिग आणि एयर इंडियाने यासाठी सहमती दर्शवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी शहरातील एका औद्योगिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी एयरपोर्ट डायरेक्टर यांची भेट घेऊन मागणी केली होती की, त्यांनी पुणे आणि सूरतसाठी उड्डाण सुरू करावे. या दोन्ही शहरांसाठी उड्डाण नसल्याने लोकांना कनेक्टिंग उड्डाण घ्यावे लागते. ज्यामुळे खुप वेळ लागतो. डायरेक्टर यांनी यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. डायरेक्टर यांच्यानुसार, त्यांनी फ्लायबिगच्या अधिकार्यांना सूरतचे उड्डाण सुरू करण्यास सांगितले तेव्हा ते यासाठी तयार झाले.
डायरेक्टर यांनी सांगितले की, फ्लायबिग कंपनीचे एक 72 सीटर विमान याच महिन्यात येणार आहे. ज्यानंतर ते सुरू होईल. याशिवाय मागील काही दिवसांपूर्वी एयर इंडियाचे मोठे अधिकारी इंदौर येथे आले होते, त्यांच्याशी चर्चा करून पुणेसाठी उड्डाण सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. ते सुद्धा यासाठी तयार आहेत. कंपनी लवकरच ते सुरू करेल. याच महिन्याच्या अखेरपासून समर शेड्यूलसुद्धा लागू होत आहे. ज्यामध्ये अनेक शहरांसाठी उड्डाण सुरू होतील. सध्या आम्हाला शेड्यूल मिळालेले नाही. मात्र, लॉकडाऊनच्या अगोदर ज्या शहरांसाठी उड्डाण सुरू होती त्या जवळपास सर्व शहरांसाठी पुन्हा उड्डाणे सुरू झाली आहेत. काही नवीन शहरे सुद्धा या महिन्याच्या अखेरीस जोडली जातील.