Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयललिता यांना डिस्चार्ज मिळणार

जयललिता यांना डिस्चार्ज मिळणार
चेन्नई , सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (12:03 IST)
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्या कधीही घरी जाऊ शकतात, अशी माहिती अपोलो रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून जयललिता रुग्णालयात आहेत. डॉ. रेड्डी म्हणाले की, जयललिता यांचा संसग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे त्या केव्हाही रुग्णालयातून सुटी घेऊ शकतात. त्यासाठी कोणतेही दिवस निश्चित नाही. या माहितीनंतर तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 
जयललिता यांना 22 सप्टेंबररोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी अपोलो रुग्णालयाचे डॉ. प्रताप रेड्डी यांनी जयललिता यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.
 
डॉ. रेड्डी म्हणाले, मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृती सुधारली आहे. त्यांनी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आजूबाजूला काय सुरु आहे, त्यांना काय हवे हेदेखील त्या सांगत असल्याचे रेड्डी यांनी नमूद केले. अतिदक्षता विभागातून लवकरच त्यांना खासगी खोलीत हलवले जाईल अशी माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी सकाळी दिली होती. ह्रदयरोज तज्ञ, श्वास चिकित्सक, संसर्गजन्य रोगांचे तज्ञ आणि मधूमेह विशेषज्ञ यांच्या देखरेखीखाली जयललिता यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
68 वर्षीय जयललिता या दीड महिन्यांपासून रुग्णालयात भरती असल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. जयललितांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत दाखल झाले. पण त्यांनादेखील जयललिता यांची भेट घेण्यास मज्जाव करण्यात आले होते. जयललितांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी पूजाअर्चनाही सुरु होत्या. शुक्रवारी डॉक्टरांनी जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट करताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. एआयएडीएमकेच्या नेत्या सी आर सरस्वती म्हणाल्या, आम्ही खूप आनंदात आहोत, आम्ही अम्मासाठी (जयललिता) प्रार्थना करत होतो कारण आमच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. जयललिता यांच्या आजारपणामुळे राज्यपालांनी जयललितांकडील सर्व खात्यांचा कार्यभार दुसर्या मंत्र्यांकडे सोपवला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनिया गांधी देणार काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा