Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निसर्गाची किमया, समुद्राच्या मधोमध तयार झाला रेतीचा बांध

निसर्गाची किमया, समुद्राच्या मधोमध तयार झाला रेतीचा बांध
, मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (16:19 IST)
केरळमध्ये आलेल्या भयावह पुराने मोठी हानी झाली. दरम्यान केरळच्या पोन्नानी समुद्र तटावर एक अनोखं दृश्य बघायला मिळत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओत दिसत आहे की, समुद्राच्या मधोमध रेतीचा एक बांध तयार झाला आहे. या बांधाने समुद्राला दोन भागात विभागलं गेल्यासारखा दिसतो आहे. सध्या हा नजारा बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी इथे होत आहे. 
 
रेतीचा बांध पोन्ननी समुद्र तटावर साधारण १ किमी लांब आहे. याने काही अंतरापर्यंत समुद्राला दोन भागात विभागलं आहे. काहींचं असं म्हणनं आहे की, पुराने वाहून आलेल्या रेतीमुळे पोन्नानी बीचवर हे चित्र बघायला मिळत आहे. हा बांध समुद्राच्या मधोमध आहे. जिथे लांटाचा मारा कधी जास्त तर कधी कमी असतो. अशात अचानक मोठ्या लाटा आल्या तर कुणीही वाहून जाऊ शकतं. त्यामुळे नागरिकांनी तिथे जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ह्युंडईची भन्नाट ऑफर, नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका