Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kulgam:कुलगाममध्ये सुरक्षा दलां कडून पाच दहशतवादी ठार

Kulgam:कुलगाममध्ये सुरक्षा दलां कडून पाच दहशतवादी ठार
, शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (12:22 IST)
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीच्या ठिकाणी पाच दहशतवादी मारले गेले आहेत. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात सुरक्षा दलांची कारवाई अजूनही सुरू आहे.
 
कुलगाम जिल्ह्यातील सामनू गावात गुरुवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलीस, लष्कराच्या 34 आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने एका विशिष्ट माहितीवरून कुलगामच्या सामनू गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. नाकाबंदी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावरून चकमक सुरू झाली. रात्री उशिरा गोळीबार थांबला.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले आहेत. शोध मोहीम सुरू आहे. 
 
 
















Edited by - Priya Dixit  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत शेळ्या आगीवर नियंत्रण मिळवतायत, वाचा या प्राचीन प्रयोगाबद्दल