Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केला राष्ट्रगीताचा अपमान , सुनावली राष्ट्रगीत म्हणण्याची शिक्षा

केला राष्ट्रगीताचा अपमान , सुनावली राष्ट्रगीत म्हणण्याची शिक्षा
, गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (09:25 IST)

राष्ट्रगीत सुरु असताना मोबाईलवर बोलल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीस एक आठवडा राष्ट्रध्वज फडकावण्याची, ध्वजाला सलाम करण्याची आणि राष्ट्रगीत म्हणण्याची शिक्षा सुनावली आहे.   

१५ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात तामिळनाडूमधील वेल्लूर शहरातील अम्बुल येथील सरकारी रुग्णालयातील मुख्य वैद्यकीत अधिकारी ए.केनेडी राष्ट्रगीत सुरु असताना मोबाईलवर बोलत होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी सुरेश बाबू या व्यक्तीने अम्बुर शहर पोलिस ठाण्यात केनेडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

राष्ट्रगीत सुरु असताना वैद्यकीय संचालकांचा महत्त्वाचा फोन आला होता. आपला राष्ट्रगीताचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे केनेडी यांनी न्यायालयात सांगितले. यावर न्यायालयाने केनेडी यांना अजब शिक्षा सुनावली आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वेकडून पेपरलेस ओळखपत्राची सुरुवात, वापरा एम-आधार