राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालानुसार मागील वर्षी महाराष्ट्रात बलात्काराचे (rape case)सर्वाधिक गुन्हे नोंद केले गेले आहेत. त्याखालोखाल 34 गुन्हे उत्तर प्रदेशात, तर 7 गुन्हे राजस्थानात नोंदवण्यात आले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
हाथरस सामूहिक बलात्कारानंतर (rape case)देश हादरला आहे. मानवतेवर घाला घालणारी ही गुन्हेगारी प्रवृत्ती केवळ उत्तर प्रदेशपुरती मर्यादित नाही. गेल्या वर्षी देशभरात 286 महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक 47 महिला महाराष्ट्रातील होत्या.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महिलांविरोधी सर्वाधिक 59 हजार 853 गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. त्याखालोखाल राजस्थानात 41 हजार 550, तर महाराष्ट्रात 37 हजार 144 गुन्हे नोंद केले गेले.
महिलांविरोधी गुन्ह्यांचे देशाचे सरासरी प्रमाण 62.4 इतके आहे. महाराष्ट्रातील प्रमाण 63.1, तर राजस्थानात 110 इतके आहे. बलात्कार-हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 808, उत्तर प्रदेशात 359 आणि राजस्थानात 186 महिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले.
2018 मध्ये महाराष्ट्रात 900 महिला-तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार नोंद गुन्ह्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशात दर लाख लोकसंख्येमागे सरासरी सात गुन्हे घडतात, तर महाराष्ट्रात 11, अशी नोंद एनसीआरबी अहवालात आढळते. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंडयासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही महाराष्ट्र तिसर्याह, चौथ्या स्थानी आहे.