मध्यप्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री यांचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी शुक्रवारी राजीनामा देण्याची घोषणा केली. कमलनाथ यनी बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. कमलनाथ यांच्या राजीनामच्या घोषणेवर काँग्रेसचे माजी नेते आणि आता भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी टि्वट करत भाष्य केले आहे. हा जनतेचा विजय आहे, असे ज्योतिरादित्य म्हणाले.
मध्य प्रदेशातील जनतेचा विजय झाला. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे. पण राज्यातील काँग्रेस सरकार तपासून भरकटले. पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला. सत्यमेवजते, अशा आशयाचे टि्वट करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली.
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य यचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. तरीही कमलनाथ यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.