Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पतीने गोव्याची स्वप्ने दाखवून अयोध्येला नेले; संतापलेल्या पत्नीने घटस्फोट मागितला

angry
, गुरूवार, 25 जानेवारी 2024 (15:46 IST)
मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातून घटस्फोटाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका पत्नीने पतीपासून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कारण पत्नीला गोव्याला नेण्याचे आश्वासन देऊन पतीने तिला अयोध्येला नेले. यामुळे महिलेने घटस्फोटाची केस दाखल केली.
 
प्रकरण पिपलानी परिसरातील आहे. रिलेशनशिप काउन्सिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न केले होते. नवरा आयटी इंजिनिअर आहे. पगारही चांगला आहे.
 
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये हनीमूनला जाण्याबाबत चर्चा झाली, त्यानंतर पत्नीने परदेशी जाण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर पतीने आपल्या वृद्ध आई-वडिलांचा हवाला देत भारतातील कुठल्यातरी पर्यटनस्थळाला भेट देण्याचे सांगितले, यावर दोघांनीही गोव्याला जाण्याचे ठरवले.
 
पत्नीचा आरोप आहे की, असे असूनही, जेव्हा ते फिरायला जाणार  होते, तेव्हा एक दिवस आधी पतीने तिला सांगितले की ते अयोध्या आणि बनारसला जात आहेत, कारण आईला रामलालला पाहायचे होते.
 
पत्नी कुटुंबासह अयोध्येला गेली. मात्र तेथून परत आल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि पत्नीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. रिलेशनशिप कौन्सिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने हा विश्वासघात असल्याचे म्हटले आहे आणि आरोप केला आहे की पती तिच्यापेक्षा आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देतो, यामुळे लग्नाच्या सुरुवातीपासूनच ती दुर्लक्षित आहे. सध्या पती-पत्नी दोघांची काउंसलिंग सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस मुख्य अतिथि कोण? कशी करतात निवड?